ahirkhedegp@gmail.com Ph: 9552605855

ग्रुप ग्रामपंचायत अहिरखेडे पिंपळगाव धाबळी

तालुका चांदवड, जिल्हा नाशिक

गावाची माहिती

ग्रुप ग्रामपंचायत अहिरखेडे – पिंपळगाव धाबळी ही चांदवड तालुक्यातील दोन प्रगत आणि मेहनती गावांची संयुक्त प्रशासकीय संस्था आहे. दोन्ही गावं हिरव्यागार टेकड्यांच्या कुशीत वसलेली असून निसर्ग, शेती आणि परंपरेचा सुंदर संगम इथे पाहायला मिळतो.

येथील जमीन सुपीक असल्यामुळे मका, बाजरी, कांदा, द्राक्षे आणि भाजीपाला यांची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. शेतीसोबत दुग्धव्यवसाय, लघुउद्योग, पिकांचे साठवण हीही कामं लोकांचा मजबूत आधार आहेत.

गावकरी साधे, कष्टाळू आणि एकोप्याने राहणारे. इथे वर्षभर कीर्तन, भजन, यात्रोत्सव, नवरात्र, शिवजयंती असे सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडतात. मराठी, हिंदी, आहिराणी आणि भिली बोली सर्वत्र ऐकायला मिळते.

भौगोलिक व सांस्कृतिक वैशिष्ट्ये

दोन्ही गावांची सामान्य माहिती

अहिरखेडे – सामान्य माहिती

विशेष एकूण
जनगणना२०११
कुटुंब२०३
APL१२९
BPL७४
लोकसंख्या१०३०

पिंपळगाव धाबळी – सामान्य माहिती

विशेष एकूण
जनगणना२०११
कुटुंब१०५
APL१०८
BPL
लोकसंख्या८६९

दोन्ही गावांचे भौगोलिक क्षेत्रफळ

अहिरखेडे गावाचे भौगोलिक क्षेत्रफळ : २६८ हेक्टर ६२ आर

क्षेत्राचे नाव क्षेत्रफळ (हे.)
एकूण क्षेत्र२६८.६२
शेती उपयोगी क्षेत्र२४५.६६
बागायती क्षेत्र२४१.२०
जिरायती क्षेत्र४.४६
वन क्षेत्र०.००

पिंपळगाव धाबळी गावाचे भौगोलिक क्षेत्रफळ : ५६८ हेक्टर ७२ आर

क्षेत्राचे नाव क्षेत्रफळ
एकूण क्षेत्र५६८.७२
शेती उपयोगी क्षेत्र४६७.६१
बागायती क्षेत्र४२९.५१
जिरायती क्षेत्र८.४६
वन क्षेत्र०.००

पाणी पुरवठा स्रोत

घटक संख्या
पा.पु. योजना
विंधन विहीर
पक्के बंधारे
सार्व विहिरी
खाजगी विहिरी २००

शैक्षणिक व सामाजिक माहिती

माहिती संख्या
जि. प. प्राथमिक शाळा
अंगणवाडी संख्या
महाविद्यालय

संयुक्त धार्मिक स्थळे

स्थळ संख्या
मंदिरे १०
समाजमंदिर

गावातील सुविधा

सुविधा संख्या
ग्रामपंचायत
सोसायटी
पोस्ट कार्यालय
रास्त भाव दुकान

गावांजवळील सुविधा

सुविधा अंतर
तालुका ठिकाण १० किमी
ग्रामीन रुग्णालय ५ किमी
जिल्हा रुग्णालय ६० किमी
बस स्थानक ३ किमी
रेल्वे स्थानक ८ किमी